जरासे! -२

आमची प्रेरणा साती यांची सुंदर कविता जरासे!


ढिगा येवढ्या जाडश्या चंडिकेने
घटावे जरासे जरासे अटावे ॥


जसे खात जाते तसा भार वाढे
गिळावे जरासे जरासे पळावे


अदीमानवी हे तुझे रूप राणी
दिसावे जरासे जरासे टळावे॥


थरारून जातो तिचा स्पर्श होता
थिजावे जरासे जरासे रडावे॥


तुला घाबरूनी उठावे पहाटे
हसावे जरासे जरासे विसावे॥


तुला सांगतो "केशवा"ऐक माझे
लिहावे जरासे जरासे लपावे॥

-केशवसुमार.