मामला-२

आमची प्रेरणा वैभव जोशी यांचा मामला 


तुंबले ड्रेनेज आहे कारणा वाचून का?
मामला नाजूक आहे कारणे मागू नका!


घेऊनी हातात लोटा घाईने मी चाललो
' हा असा कोठे निघालो' पाहण्या थांबू नका


आज ही हातात लोटा घेऊनी मी तिष्ठतो
'सीन' आता रोजचा हा पाहूनी हासू नका


थांबणे बाहेर थोडेसे मला ना वावगे
लोक हो तुमचे तुम्ही अर्धामध्ये सोडू नका


ठेवली घेऊन मी पाने बरोबर फाटकी
पुस्तके आता जुनी ही मागण्या येऊ नका


चालती संवाद तेथे 'काय मी सांगू तुम्हा'?
ते मला जमणार नाही तेवढे सांगू नका


तू किती घाणेरडे लिहलेस मेल्या "केशवा"
(लोक हो तूम्ही चवीने वाचण्या लाजू नका)


-केशवसुमार