मनोगतावरील ह्या नव क्रांतीला सलाम !

मनोगतावरील बदल हे वेळोवेळी घडत होते व आपण सर्व /  आपल्यापैकी काही ह्या बदलांबाबत वेळोवेळी टिका~टिपण्ण्या, सुचना~सुचवण्या, विनंत्या~आर्जवे करीत आलोच आहोत.

आज जेव्हा सर्व बदल घडून आलेले दिसत आहेत तेव्हा हे बदल स्वागतार्ह्य करणे हे अंगवळणी पाडून घ्या असे आव्हान करण्यासाठी ह्या लेखाचे प्रयोजन.

हा लेख टंकाळताना, अजून मला हे माहित नाही की, कदाचित "आपला लेख प्रशासकांच्या विचाराधीन आहे" असा संदेश सुपूर्द केल्यावर उमटेल की नाही - व ह्यातच खरे ह्या बदलाचे गमक असावे !

माझ्या जीवनांतले काही अनुभव, ज्यावरून मी बऱ्याच गोष्टी शिकलो; त्या येथे देत आहे - (आवश्यकत: नाही की वाचकांनी त्यांच्याशी सहमत असलेच पाहिजे....) आपणास योग्य वाटल्यास दाद द्या अन्यथा मुर्खाची बडबड म्हणून दुर्लक्ष करा !

अमेरिकेत रक्ताची सदैव चणचण भासते - म्हणून 'मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी' चा  तेथे उदय झाला.... रक्ताचा थेंब न् थेंब कसा वाचवता येईल त्याचे "संशोधन" केले गेले..... भारतात परिस्थिती विरूद्ध आहे. आपल्या पैकी कोणाची शस्त्रक्रिया असेल तर बाटली भर सोडा.... बालदी भर रक्त द्यायला आपण तयार असतो. फक्त निरोप जायचा अवकाश.... आपली मंडळी कर्तव्यतत्परतेने धाव्वत येतात....

भारतात माणसे अक्षरशः कुत्र्याच्या मौतीने मरतात !
नोयडा सारख्या ठिकाणी १५/२० बालकांचे सांगाडे सापडतात तरी आपण क्रियाशुन्य !
कारण ? अहो.... रोज मरे, त्याला कोण रडे ?
एक ब्रिटीश नागरिक नाहक मरू द्या....
सरकार जमीन पाताळ एक करून त्याच्या मृत्युचे कारण शोधेल !

आखाती देशांत मोटार गाडी चालू ठेवून त्यातली वातानुकूलीत यंत्रणा बंद पडू न देण्याची "काळजी" घेत माणूस बाजारहाट करतो म्हणे.....
पेट्रोल स्वस्त आहे ना !
भारतात स्कुटर उतरंडीला आली की न्युट्रलला बंद करून जितकी जाईल तितकी खेचावी लागते !
( खर्रच सांगतोय!)

बेकारी ने भरलेल्या ह्या देशांत बालमजूरी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तर बांधकामाला मजूर न मिळणाऱ्या देशांत मजूरांची पळवा पळवी होते.......

आहे की नाही विरोधाभास ?

आता ..... "ह्यात मनोगताचा संबंध कुठून आला ???"

अहो,
जेथे पिकते तेथे विकत नाही.......
येथे पीकं म्होपं आलयं -  सदस्यांचे व लेखनाचे !
पीकाची काळजी घ्यायचीच कश्यापायी ?
अहो, खायचे तर खा नाहीतर चालू लागा ह्या प्रवृत्तीचा दाता असेल तर दान कश्याला म्हणायचे ? 

"मराठी  असे आमुची मायबोली -
आम्ही तीचे पांग  फेडू चालबोली.....
आम्ही असू लेकूरे मराठीची -  
ठेवू आम्ही मराठी पायाखाली......"

मराठीतली माणसे जेव्हा मराठी विकत घेण्या देण्याची भाषा बोलतात........
मग आपल्या सारख्यांनी कुठली भाषा बोलायची -
तेही सांगून टाका .
(व्यक्तिगत उल्लेख काढून टाकलेले आहेत : प्रशासक)