गझल ?

आमचे स्फूर्ती(?)स्थान - विक्षिप्त ह्यांची गझल

वादळी वाऱ्यात चोळी वाळली
आटली, भलतीकडे अन फाटली

काय कामाचे अम्हां अल्लड नयन ?
त्या नशेहुन स्वस्त पडते बाटली !

लावला हंडाच ओठाला तिने
वारुणीची सवय बहुधा लागली

सील पिंपाभोवती होते तरी
जाणकारांनी बरोबर 'ताड'ली

का कळेना टुन्न इतका जाहलो
रम नव्हे, ती फक्त होती बारली

खोडसाळा शीक गाणे गोड तू
फार ही कर्कश तुझी केकावली