हिम्मत-२

आमची प्रेरणा स्नेहदर्शन यांची कविता हिम्मत..


जिभेला तुझ्या आवरवे जरा तू
वजन वाढलेले पहावे जरा तू


          भरारी पुन्हा उंच घेण्यास गगनी
          कमी वजन थोडे करावे जरा तू


मजा मिसळीची निराळीच मित्रा
परी संयमाला धरावे जरा तू


          अता आळसा जरा रोज टाळा
          पहाटे उठोनी पळावे जरा तू


तुझे मित्र व्हावे तुझ्या दुश्मनांनी
असे"के. सु." काही लिहावे जरा तू


(वजना बाबतीत जागरूक)केशवसुमार.


(व्यक्तिगत स्वरूपाचे संदर्भ काढून टाकलेले आहेत.: प्रशासक)