गझल -२

आमची प्रेरणा विक्षिप्त यांची गझल


वादळी वाऱ्यात ती मज भेटली
(आयती संधी मला हो वाटली)


लोक अमच्या भोवती होते तरी
ती मला भलतीच होती खेटली


पाहता माझेच नयन झुकले जरा
ती जरा सुद्धा न तेव्हा लाजली


लावता ओठास ओठाला तिने
त्या नशेने सर्व काया पेटली


जाग स्वप्नातून का आली  मला?
बायको कैदाशिणी सम पातली


"केशवा" झाली सुरू का लेखणी?
तू पुन्हा चकली नव्याने पाडली!!


 - केशवसुमार