भाजणी

  • ४ वाट्या बाजरी,२ वाट्या ज्वारी,१ वाटी उडदाची डाळ,१ वाटी हरबरा डाळ
  • १/२ वाटी गहू,१/२ वाटी तांदूळ,१/२ वाटी धने,२ चमचे जिरे
३० मिनिटे
गैरलागू

वरील सर्व धान्ये वेगवेगळी भाजून घ्या,धने व जिरे ही भाजून घ्या.एकत्र करून भरड दळून आणा.

धान्यांच्या प्रमाणात कमीजास्त करण्यास हरकत नाही.

थालिपिठ करताना कांदा,कांद्याची पात,हिंग,हळद,मीठ,तिखट किवा हिरव्या मिरचीचे तुकडे भाजणीत घाला,पाणी घालून मळा.तव्यावर तेल घालून थालिपिठ लावा,त्याला मध्ये भोक पाडा‍. झाकण ठेवा व मंद विस्तवावर भाजा.
पुढचे थालिपिठ प्लॅस्टिकच्या कागदावर थापा.पहिले तव्यावरून काढले की परत थोडे तेल तव्यावर घालून थापलेले थालिपिठ त्यावर घाला.अशी सगळी थालिपिठे करा.

पावसाळी हवेत गरमगरम  थालिपिठ आणि वर लोण्याचा गोळा!वावा!

याच भाजणीचे वडेही करता येतात.वडे करताना भाजणीत कांदा किसून घातला तर छान लागते.तिखट,मीठ,हिंग,हळद भाजणीत घाला. मळून गोळा करून घ्या.प्लॅस्टिकच्या कागदावर वडे थापा,तेलात वडे तळा.दह्याबरोबर खा.

रुचिरा