ईंजीनियरिंगला मुले का नापास होतात?

शिकण्यात कधी interest होता, पण बारावीला पेर्सेंटेजचा भुत्या मागे होता.


नाहीतर आमच काय होत्याचा झाला नव्हता, कारण अभ्यासाच्या धडावर नेहमीच घातला कोयता.


ईंजीनियरिंगला आलो ही तीर्थरूपांची क्रुपा, ईंजीनियर हो म्हणून भरीस घालते शेजारची क्रुपा.


ईंजीनियरिंगचा अभ्यास फ़ार मोठा करू या जपा, अभ्यास सोडून ईतरच सर्व केले रिझल्टच्या वेळेस आता कुठे लपा?


होते २४ तास पण झोप नव्हती सरत, व्हायची मध्यरात्र पण गप्प नव्हत्या सरत.


वेळच्यावेळी मेसचे खाऊन पोट नव्हते भरत, ईंजीनियरिंगच्या conceptsशी करत नव्हतो कसरत.


होते seniors सांगायला करू नकोस काही, आम्ही नाही केले आमचे बिघडले का काही?


त्यांच्यावर ठेवला विश्वास, आणि तसेच केले सर्व काही, आता marks मिळवलेत काहीच्या बाही.


एवढे हजार, एवढे लाख, मोजतात आईवडिल खर्च, एवढे दिवस, एवढा पगार मी लावतो पदरच!


ईंजीनियर होऊनही ज्ञान मिळवलं वरवरचं, आता बोल लावू कुणाला सांगतो तुम्हाला खरोखरच!