पाप-२

आमची ह्या पापाला कारणीभूत चैतन्य दीक्षित यांच पाप


खात मी आहेच पैसे रोज येथे
शोधतो मी सावज नवे भेटते का!


रेट आहे थेट सारा ठरवलेला
ही अशी जनता खुळी मग राबते का?


जमवली मी खूप माया ह्याच मार्गी
(पाहतो हे 'पाप' मजला लाभते का?)


जेल आहे व्हायची रे एकदाची
पाहतो शिक्षा जरा ही लांबते का?


खेळ हा आहे जुना तू फक्त प्यादे
"केशवा"पण लाज तुजला वाटते का?


-केशवसुमार