सांभाळ तू -२

आमची प्रेरणा पुलस्ति यांची कविता  सांभाळ तू ..


फुकटचे सल्ले अम्हाला द्यायचे अबा टाळ तू
ओळख स्वतःच्या मर्यादांना आणि त्या पाळ तू


पैंजण, साकी, दिपा, डान्सबार हे बंद केले
समजतोस काय अबा आता अम्हाला बाळ तू?


ज्याला जसे पाहिजे त्याला तसे जगू दे जरा
सभ्य त्या संस्कृतीस आपल्या घरी जाळ तू


वाढला महिमा तुझा पण वाढली उंची कुठे?
(आठव ती माडी जुनी आणिक तिथले चाळ तू)


काय आता करवे सांग या अबलांनी येथे?
केली होतीस का स्वतःची बुद्धी गहाळ तू?


अंधारले चोहींकडे अन वाट चुकलेली तुझी
येईल कोणी तरी पेटवण्या तुला सांभाळ तू


'त्या' जगाचे दुःख आहे नेहमीचे हे रडे
मीट डोळे "केशवा"अन दोन अश्रू ढाळ तू!


केशवसुमार