भगवद्गीता अर्थ

नमस्कार.


भगवद्गीतेतील श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचताना निरनिराळ्या प्रकाशकांच्या पुस्तकांत निरनिराळे अर्थ वाचावयास मिळाले.


भगवद्गीतेच्या १० व्या अध्यायातील ३७ वा श्लोक, " वृष्णीनां वासुदेवः अस्मि--" ( मी संधी सोडवला आहे ) असा आहे. त्याचा अर्थ, सार्थ श्रीमद्भगवद्गीता, जयहिंद प्रकाशनमध्ये, "यादवांमध्ये वासुदेव मी " असा आहे. तसेच, प्रणवगीताई या पुस्तकात या श्लोकाचा अर्थ "वृष्णीवंशीयातील यादवांमध्ये वासुदेव मी आहे " असा आहे.


परंतु भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकांत " वृष्णीवंशीयांमध्ये वासुदेव मी आहे. " असा अर्थ आहे. परंतु खाली तात्पर्यात  " श्रीकृष्ण आणि बलदेव हे दोघेही वसुदेव पुत्र म्हणून अवतीर्ण झाले.यास्तव या दोघानाही वासुदेव म्हणता येते.  दुसऱ्या दृष्टीने विचार केल्यास, श्रीकृष्ण हे वृंदावन सोडून जात नसल्यामुळे इतरत्र आढ्ळणारी त्यांची सर्व रूपे म्हणजे श्रीकृष्णांचा अंश असल्यामुळे वासुदेव आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. आपण जाण्ले पाहिजे की, भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये उल्लेख केलेला वासुदेव म्हणजे बलदेव किंवा बलराम आहे.


जाणकार व्यक्ती यावर काही प्रकाश पाडतील का?