खवीस

आमची प्रेरणा कविवर्य मिलिंद फणसे ह्यांची बहारदार ग़ज़ल परीस


संधिकाल, धूम्रपान कुंद मैफलीत गात
ओरपून जेवतेस भरभरून वांगंभात


केस मोकळे, घुशीसमान चेहरा तशात
ते हिडिंब लाजुनी लपेल खोल रौरवात


मस्त एक्शेवीस पान, त्यास लावूनी किवाम
पिंक तूच टाकलीस धुंद त्याच कोपऱ्यात


शुद्धबुद्ध हारतो असे अघोर घोरगान
रेकण्यास गर्दभी नसे तुझ्या तुला जगात


टोचतेस आणि दात, मारतेस तूच खास
पाहूनी तुला लगेच पंचप्राण ये गळ्यास


टांगला तुला बघून जीव सखा टांगणीस
हाय वाकलाच खांब, तू उभीच मारण्यास


गोडभात ना जिरे, कशी डकारली मनात
घेतलास आवळून सोडवून दोर खास!


तू खवीस  मूर्तीमंत, लागलीस या जिण्यास
या सजीव माणसास आणलेस राक्षसांत