तुझ्या ग्लासांत फेणी

आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकर यांची कविता तुझ्या डोळ्यात पाणी


तुझ्या ग्लासांत फेणी
माझ्या ग्लासांत फेणी
चार पेगा नंतर
म्हणू वात्रट गाणी


एक रोटी तुला
एक रोटी मला
ह्या कडक रोट्यांना
थोडं लाव लोणी
तुझ्या ग्लासांत फेणी
माझ्या ग्लासांत फेणी

एक पुलाव तुला
एक पुलाव मला
त्यापेक्षा मागवूया
झकास बिर्याणी
तुझ्या ग्लासांत फेणी
माझ्या ग्लासांत फेणी

एक मिरची तुला
एक मिरची माला
तोंडात पडली आग
तरी प्यायची नाही पाणी
तुझ्या ग्लासांत फेणी
माझ्या ग्लासांत फेणी

एक सूर तुझा
एक सूर माझा
अशी गर्दभ गीते
ही म्हणतात बेणी
तुझ्या ग्लासांत फेणी
माझ्या ग्लासांत फेणी


एक कविता तुझी
एक कविता माझी
तुला करती वाह वा
केशवाला मात्र शेणी
तुझ्या ग्लासांत फेणी
माझ्या ग्लासांत फेणी


- केशवसुमार.