मेघ नसताचे विडंबन

दोष नसता चूक नसता लोक मारू लागले !


जाहले इतुकेच डोळा मुडपुनी तिज पाहिले !


लाख बुक्क्या आणि लाथा मारल्या त्यांनी मला


आणि माझे अंगवैभव ठणठणाया लागले !


एवढे नाजूक माझे गाल त्यांनी सुजवले


आसवांचे थेंबदेखिल जाळ वाटू लागले !


पाहता मजला पळाली वानरेही त्या क्षणी


वाटले त्यांना 'कुणी स्पर्धा कराया लागले'


झोपताना मी कुलुपही लावले दारावरी


"मारतिल घुसुनी घरी ते" भय तयांचे वाटले !!


दोष नसता चूक नसता लोक मारू लागले !