ही काही दिवसांपूर्वीच मी मायबोलीवर पोस्ट केली आहे. मायबोलीच्या नियमीत वाचकांची क्षमा मागून -
======================
राजकारण थोर त्याचा अर्थ लावावा कसा?
प्राण तो घ्यावा कसा मी प्राण हा द्यावा कसा?
एकही नेता मिळेना का आम्हां नि:स्वार्थसा?
जो मुळी आडात नाही पोहरी यावा कसा?
पाखरे जमली सभोती माझिया - नि:शब्द ती
बोलती सारे डबे हा दिवस काढावा कसा?
चार कामे देवधर्माची अम्ही करतो तरी
एवढ्याश्या मिळकतीवर खर्च भागावा कसा?
तू दिलासच चाळणीने, उधळला ना मी कधी
सांग आता राहिलेला जन्म वेचावा कसा?
जाणणारे ती अबोली वेदना गेले कुठे?
दु:ख माझे मांडणारा शब्द शोधावा कसा?