मी जीवनाची साथ नित्य देत राहिलो

मै ज़िंदगी का साथ निभाता चला गया
चित्रपट : हम दोनो (१९६१)
गीत : साहिर लुधियान्वी
संगीत : जयदेव

मी जीवनाची साथ नित्य देत राहिलो
धूरात काळज्यांस मी उडवीत राहिलो   ॥धृ॥

होताच व्यर्थ शोक तो उध्वस्त होण्याचा
उध्वस्त होणे साजरे करीत राहिलो  ॥१॥

जे गवसले तयास मानले नशीब मी
जे निसटले तयास मी विसरीत राहिलो  ॥२॥

दु:खात अन सुखात जिथे फरक ना दिसे
ह्रदयास मी स्थळी अशाच नेत राहिलो  ॥३॥

मूळ गाण्याचे बोल इथे आहेत. मूळ गाणे इथे आहे.