ज्योतिषशास्त्र- काही प्रश्न

आपल्यापैकी बरेचजण आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. आपल्याला फारसा रस नसला तरी आप्तांच्या सांगण्यावरून आपण एखाद्या ज्योतीष्याकडे जाऊन त्यांचे मार्गदर्शन घेतो. माझ्यासारखे काही जातक ज्योतिष्यावर पुस्तके वाचून ते समजून घेऊन आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वत:च शोधण्याचा प्रयत्न करतात. मी आतापर्यंत काही पुस्तके वाचली आहेत, पण बऱ्याच पुस्तकांत काही प्राथमिक गोष्टिंची ओळख करुन देऊन सरळ कोणता ग्रह कोणत्या ठिकाणी असता कसे फळ मिळते याचे विवेचन दिले जाते. माझे काहि प्रश्न अनुत्तरीत वा अर्ध-उत्तरीत आहेत. मनोगतींनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे देऊन माझ्या ज्योतिष विषयक ज्ञानात यथाशक्ति भर घालावी हि विनंती.तसेच आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर उपस्थित करावेत.

 प्र. १) नवमांश , चलीत व निरयन भावचलित कुंडली म्हणजे काय?

प्र. २) शंखचूड कालसर्प योग म्हणजे काय? तो कशामुळे होतो? त्याचे परिणाम काय होतात?

प्र. ३) गुरू हा शुभ ग्रह आहे असे म्हणतात, जर पत्रिकेत गुरु निर्बली वा अशुभ ग्रह-संबंधित असेल व सध्या गुरुची महादशा चालू असेल तर जातकाला गुरुच्या कारकत्वा संदर्भात शुभ फळे मिळतील कि अशुभ?