कोणत्या मलमाने आता
दाद शमवावी ना कळे
जाहले कैलास जीवन
बीटेक्सने तन पोळले
खाज बघ तन जाळते
कणकणाने मन आटते
पुन्हा उचलल्या हातांना
नेहमीचे सारे वाटते
कधी धरावे कंगव्याला
कंड हा पळवावया
अंग सारे अवघडले
कृष्ण ही पडलीच काया
बादली भरलीच नाही
थेंब नाही घरच्या नळा
पालिकेस का येत नाही
अद्याप माझा कळवळा