आमची प्रेरणा मृण्मयी ह्यांची कविता ढग
वसंतात कोणा बयेने असे घसरू नये
कुठल्याही बाप्याला कधी गृहित धरू नये
तो जाईल पळून नव्या मैत्रिणी शोधण्या
सांडावर स्वत:हून काया पखरू नये
चंचल पुरुष सारे, कधी इथे कधी तिथे
असू दे, म्हणून काय त्यांनी प्रेम करू नये ?
टाळी एक हातानी वाजे न यौवनी
तू नसशील तेव्हा मुलांनी कुरकुरू नये ?
आहे निरुपयोगी, गुरांनो, जीभ चाटणे
कुरण खोडसाळाचे असे, आस धरू नये