पास-नापास

आमची प्रेरणा मृण्मयी ह्यांची कविता ढग

परीक्षेस बसलेल्या मुलांनी विसरू नये
       पुढच्या मुलाला कधी गृहित धरू नये
तो जाईल निघून नव्या वर्गात शिकण्या
       त्याच्या बुद्धिवर इतका भरवसा पखरू नये
उत्तर प्रश्नांचे कधी येते कधी नाही
       बालका, नंबरावरी उगी प्रेम करू नये
नापास एकटा तू न वर्गात या झालास
      पास नाही म्हणुनी मुलांनी घाबरू नये
'केशवा', निरुपयोगी शब्दांची शुष्क रचना
       काव्य  असेले कोणास, कधी स्फुरू नये