मोकळ भाजणी

  • १ वाटी थालिपीठाच्या भाजणीचे पीठ
  • चिरलेला कांदा अर्धी वाटी, शेंगदाणे भाजलेले/कच्चे अर्धी वाटी
  • कोथिंबीर अर्धी वाटी, नारळाचा खव अर्धी वाटी
  • १ चमचा तिखट, हळद अर्धा चमचा , हिंग थोडासा, मीठ,
  • साजूक तूप, लिंबू
१५ मिनिटे
२ जण

थालिपीठ लावण्याकरता थालिपीठाची भाजणी जशी भिजवतो तसेच पीठ भिजवणे. त्यात तिखट, हळद, हिंग व चवीपुरते मीठ घालणे. फोडणीमध्ये कांदा व दाणे घालून कांदा परतून शिजवणे. 

नंतर थालिपीठ थापण्याकरता भिजवलेल्या पीठाचा गोळा  घालून कालथ्याने पीठ मोकळे करावे. मध्यम आचेवर हा पीठाचा गोळा झाकण ठेवून वाफेवर शिजवणे. प्रत्येकी ३-४ मिनिटांनी झाकण काढून परत तो गोळा कालथ्याने  मोकळा करत रहाणे. अशा ७-८ वाफा दिल्या की हळूहळू गोळा वाफेवर शिजून मोकळा होईल. म्हणूनच ह्याला मोकळ भाजणी म्हणतात. थोडक्यात आपण वाटली डाळ कशी करतो तशीच पद्धत आहे.

रोहिणी

खायला देताना डीशमधे मोकळ भाजणी घालून त्यावर चिरलेली कोथिंबीर, नारळाचा खव व साजूक तूप घालून द्यावे, शिवाय आवडत असल्यास लिंबू पिळणे. याशिवाय कैरीचे लोणचे किंवा दही पण घेतात. जोडीला आवडत असल्यास कच्चे/भाजके दाणे व कच्चा पांढरा कांदाही घेतात.

सौ आई