तिला का लागली उचकी नका मागू खुलासा

तिला का लागली उचकी नका मागू खुलासा
तशी आहेच ती कुचकी नका मागू खुलासा

तिला का लागला ठसका नका मागू खुलासा
तिचा आवाजही बसका नका मागू खुलासा

तिला का खोकला झाला नका मागू खुलासा
पतीही औषधेवाला नका मागू खुलासा

तिला का जाहली सर्दी नका मागू खुलासा
वहाते नाक बेदर्दी नका मागू खुलासा

तिला का जांभई आली नका मागू खुलासा
उभ्याने पेंगही झाली नका मागू खुलासा

- माफी

वैभव जोशी ह्यांच्या बंदिनी वर थोडेसे आधारित

अतिरिक्त संदर्भ
एका घर्मबिंदूचे मनोगत
तिची का रंगली मेंदी (काव्यात्मक नाट्याविष्कार)