(उडवेलही पिसारा)

(उडवेलही पिसारा)

हारू नये म्हणोनी, षटकार फक्त मारा...
मग मंदिरा असो किंवा सोबतीस मदिरा...

केव्हा समोर जाऊ, हलकेच मांजरीच्या ?
(बोका तिथेच थांबे, पाहून तो दरारा)

हा थांबला जरासा, आनंद भेट घेण्या.......
(दुसऱ्याच आठवां तू, देऊ नकोस थारा)

रंगात रंगण्याचा, आहे मज़ा निराळा!
गेला न रंग त्याचा, तो वाटतो बिचारा...

सांगू नकोस मजला,तू भाव काकडीचे
त्या सावळ्या मुलीने, केला जरा इशारा!

सुचतील सहज ओळी, जुळतील हझल-गाणी
जन्मेल हास्यपक्षी, उडवेलही पिसारा!

- कारकून

माझी प्रेरणा कुमार जावडेकर ह्यांची कविता   जुळवून ठेव तारा