म्हणे मी कविता करते :)

नसल जवळपास कुणी की
एकट्यानीच बडबडायच
कधी त्याला कविता तर
कधी वेड म्हणायच

चारच ओळी झाल्या तर
थोडस पाणी घालुन वाढवायच
इकडुन तिकडुन शब्द शोधुन
कडव हळूच चढवायच

कधी हिंदी तर कधी
संस्कृताने थोडस मढवायच
छान माझी कविता म्हणुन
प्रत्येकालाच पढवायच

मार्गदर्शन करा गुरु
म्हणुन त्यांनाही पकवायच
नाहीच कुणी वाचल
तर हळूच येउन उडवायच

श्यामली!