कळत होते जवळ येताना
कि हे सुख क्षणिक आहे
वळत नाही अजुनही
कि हे दु:ख क्षणिक नाही ।
तू म्हणालीस मी तुला कधी विसरणार नाही
मी म्हणालो मीही कधी तुला विसरणार नाही
अर्धसत्यच ठरले ते
कारण मी तुला विसरलोच नाही ।
मनात माझ्या अघटित घडले
प्रेमकाव्य मज स्फ़ुरु लागले
कुणी म्हणाले उरलेसुरले
शहाणपण तुज सोडून गेले ।
---- केशव काळे