आमची प्रेरणा पुलस्ति यांचे शब्द
झोपे मध्ये चुळबुळतो
झोपे मध्ये बडबडतो!
मी लिहितो शब्द असे तो
वाचून ते का चिडतो?
तुझ्याच मनी का संभ्रम?
थेट जरी मी हे लिहितो
तव ह्रदयी किल्मिष नाही?
तोल तुझा मग का ढळतो?
जालावर लिहण्या आलो
प्रशासक पण तडमडतो
हो मीच तिचा नावडता
नको तिथे बघ कडमडतो!
"केश्या" या जालावरती
लोकांना तू का छळतो!
-- केशवसुमार