खणले रे

आमचे प्रेरणास्थान : फुलले रे क्षण माझे ......

खणले रे पथ माझे खणले रे
ड्रेनेजच्या  हो   टेलिफोनच्या
आणि गॅसच्या लोकांनी
तुटले रे पथ माझे तुटले रे

धुळीच्या लोटात गर्दीच्या पोटात भयभीत जीव फिरे
डांबरीकरण, कांक्रीटीकरण लोकांचे मरण रे
या वेडाच्या, आधीन शासन झाले मिंधे रे
पैशांच्या थैलीने
खणले रे .............

रीत ही दरवर्षीची थांबेना
रहदारीची दुर्दशा साहवेना
कुणा सांगु मी काय सांगु मी
निबर मनास काही उमगेना
पोटाच्या खळगीने
खणले रे पथ माझे खणले रे

                          ------- केवाका