माझा निसर्ग

तुझे आयुष्य जेव्हा ऋतू बदलते

माझे जीवन तेव्हा निसर्ग बनते

तुझ्या चाहुलीचे जेव्हा आकाश दाटते

कोकीळ स्वर माझे तेव्हा स्वागती गाते

दुष्काळी सुख जेव्हा कोरडे पडते

आसवांत तुझ्या तेव्हा मी ओलावते

तुझ्या प्रीतीचे जेव्हा दाट धुके पडते

गारठलेले मन माझे तेव्हा शहारते

देदीप्यमान तुझे लौकिक जेव्हा झळाळते

तुझ्याच सावलीत तेव्हा मी सुखावते.

प्राजक्ता.