डॉक्टर डॉक्टर!

नमस्कार,

आपण डॉक्टर कडे का जातो?, किंवा आपला एक ठरलेला Family  डॉक्टर (मराठी षब्द सुचवावा) का असतो?. तसे बघायला गेले तर पहिल्या प्रष्नाचे ऊत्तर जरा सोपे आहे, आपलि तब्येत खराब झाल्यावर, पण दुसऱ्या प्रष्नाचे ऊत्तर जरावेगळे असु शकते. ते म्हणजे, घराजवळ आहे म्हणून, गोळ्यांना ग़ुण आहे म्हणून, जुनी ओळख आहे म्हणून...

सांगायची बाब अशी कि आजकाल हे डॉक्टरही खेळकर झालेत, आता बघा ना घाटकोपर मध्ये एक असेच डॉक्टर आहेत कि जे कमी शुल्कात रूग्णांना मार्गदर्शन करतात (फ़क्त ५.०० रुपये), आणि त्यांच्याकडे गर्दिही भरपुर असते, पण जरा विचार करण्यासारखी गोष्ट अशि आहे की त्यांना हे परवडतं कसं?, वातानुकूलित दवाखाना, १ सहकारी, आणि घाटकोपर सारख्या ठीकाणि दवाख़ाना.... मग असे लक्षात आले कि कोणताही रुग्ण त्यांच्याकडे गेलाकि ते त्याला किरकोळ तापाच्या जागी मलेरिया झालाय (किंवा ईतर कोणताही किरकोळ आजार) असे सांगुन जवळच्याच रुग्णालयात पाठवत, तो रुग्ण रुग्णालयात गेल्यावर तेथील डॉक्टर चांगले लांबलचक बिल लाऊन त्याला लुबाडत आणि त्या बिलाच्या रकमेतून २५% हिस्सा हा दवाखान्यातील डॉक्टरचा असे. म्हणजे अख्या दुनियेला चुना लावण्याचि चांगलिच पद्धत या डॉक्टरांनि चालवलेली आहे. आणि हि गोष्ट खरी आहे.

बऱ्याचदा असे दिसून येतेकि आपले डॉक्टरही कधिकधि छोट्याश्या कारणावरुन आपल्याला काहि चाचण्या अथवा दुसऱ्या कुठलातरी डॉक्टरला भेटण्यास सांगतात (हा जर काहि प्राणघातक आजार सोडलेतर), आणि पुढे चाचण्यांमध्ये काहि निष्पंन्न होत नाहि, आणि हे बव्हंशी बऱ्याचवेळेला घडते. तर आपण या ग़ोष्टिला काय म्हणु शकतो.....

याबाबद आपले विचार आणि अनुभव याठीकाणि मांडावेत....