चूक

माझीच चूक होती
पोटात भूक होती

पुसता कुणी खुशाली
सारीच मूक होती

शहरात जिंदगी त्या
फक्त दमणूक होती

संदेश वादळांचा
'ही तर चुणूक होती'

ती भावली मनाला
जरि फसवणूक होती

(जयन्ता५२)