सांबार (कोकणी पद्धतीत)

  • भाज्या : गवार, शिमला मिरची, दूधी (एकत्र पाव किलो) (किंवा तुम्हाला आवडेल ती भाजी)
  • कडधान्य : काळे वाटाणे, मुग, पावटे (मोड आलेले) एकत्र २५० ग्राम
  • गरम मसाला (३ चमचे), १ चमचा खसखस,
  • १ वाटी सुका नारळ (किसलेला) , १/२ वाटी कांदा (उभा चिरलेला),
  • १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, १/२ वाटी चिरलेला टोमॅटो
  • फोडणी साठी : कांदा, कडिपत्ता, लसूण, तेल
३० मिनिटे
४ जण

१.  भाज्या व कडधान्य (बारिक चिरुन) कुकर मधे शिजवुन घ्यावे.(दोन शिट्यामधे)

२. वर दिलेल्या प्रमाणानुसार खसखस, सुका नारळ, कांदा हे एकत्र भाजुन घ्यावे. (थोडे लालसर होई पर्यंत) मग कोथिंबीर व टोमॅटो टाकुन थोडेसे एकत्र भाजुन घ्यावे.

३. हे गार झाल्यावर मग याचे एकत्र वाटप करावे.(थोडेसे जाडसर वाटावे, जास्त बारीक वाटल्यास चव निघुन जाते किंवा सारण पातळ होण्याची शक्यता असते म्हणुन) ( गरम मसाला वाटपात एकत्र वाटावा कींवा सांबार शिजवताना टाकावा.)

३. गॅसवर पातेले ठेवुन (नेहमीचे ज्यात आपण वरण करतो ते) वर दिलेल्या फोडणी च्या साहित्यानुसार, फोडणी दिल्यावर, त्यात वाटलेले सारण २ मिनिटे भाजुन घ्यावे. मग शिजलेल्या भाज्या व कडधान्य मिसळून ३ वाट्या पाणी व चविनुसार मीठ टाकुन १० मिनिटे उकळी काढावी.

झाले गरम गरम सांबार तयार ...हे सांबार भाताबरोबर छान लागते.

हे सांबार कोकणीमाणसं जास्त करतात.

ज्यांना भाज्या किंवा कडधान्य आवडत नसल्यास त्यांना हे सांबार नक्की आवडेल.

गरम मसाल्या ऐवजी कोकणी मसाला वापरला तर जास्त चविष्ट लागते.

आई