तंत्रज्ञान आणि त्याचा वापर.

आज काल तंत्रज्ञानाचा वापर इतका सर्रास होतो की आपल्याला हव्या त्या ठिकाणी हवी ती माहिती उपलब्ध होते. आपल्याला हवी असलेली माहिती, गाणी, चित्र कुठेही घेऊन जाऊ शकतो. हव्या त्या माणसांशी केव्हा ही संपर्क साधता येतो.असे कितीतरी फायदे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला बघायला आणि उपभोगायला मिळतात.

पण या तंत्रज्ञानाचा वापर करणारे त्याचा कसा वापर करतात हि दुसरी बाजू तितकीच गंभीर आहे. या दोन्ही बाजू लक्षात घेऊन आपण हि तंत्रज्ञानाचा वापर योग्य रितीने केला पाहिजे आणि त्याचा वापर करताना भरपूर काळजी घेतली पाहिजे.

१.मोबाईल फोन मध्ये असलेल्या फोटो काढण्यासाठी आणि चित्रपट बनवण्यासाठी असलेल्या सुविधाच उपयोग आपण घरचे फोटो किंवा समारंभासाठी त्याचा उपयोग करू शकतो. पण त्याचा गैरवापर करणारे जास्त करून महाविद्यालयात असणारे प्रियकर आपल्या प्रेयसीचे अश्लील चित्र काढून किंवा चित्रपट बनवून ते मित्रांना आणि संगणकाद्वारे महाजालावर देतात. हे सगळं इथपर्यंतच थांबत नाही मॉलमध्ये असणाऱ्या कमी कपड्यातल्या मुली आणि काही तरुण तरुणीचे फोटो महाजालावर दिल्या बद्दल अशा लोकांना पकडण्यात आलं अशी बातमी स्टार प्लसवर बघितली.

२.मॉल मध्ये असणाऱ्या सिक्युरिटी क्येमेराचा उपयोग किंवा वायरलेस क्येमेराचा उपयोग कपडे बदलण्याच्या खोलीत दोन आरशांच्या मधल्या जागी ठेवू शकतात अस वाचण्यात आलं होत.

३.मोबाईल मध्ये असणाऱ्या संदेश पाठवण्याच्या सुविधेचा हि योग्य वापर करावा. एकदा हरवलेल्या मोबाईलवर एकाने एटिएमचा पिन कोड संदेशाद्वारे विचारून पैसे काढल्याची माहिती आहे.

४. सर्वात जास्त खबरदारी घ्यावी लागते ती कोणाला क्रेडिट कार्डाचा नंबर महाजालावर देताना किंवा ऑनलाईन ब्येंकिंग हि सुविधा वापरताना. आपल्याला हवी ती माहिती योग्य महाजालाचा वापर करून देत आहोत किंवा या सुविधेचा वापर करण्यासाठी वापरलेला संगणक स्पायवेअर आणि एडवेअर मुक्त आहे याची नोंद घ्यावी.

५. गूगल सर्च वर माहिती मिळवण्यासाठी शाळेतल्या मुलांचा वापर वाढत आहे यामुळे दिलेल्या प्रोजेक्टवर माहिती मिळवण्यासाठी हि मुलं महाजालावरून माहिती मिळवून त्याची प्रिंट आउट काढून चिटकवतात. यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेत काहीच वाढ होत नाही अस ऐकण्यात आलं.

६.एका कॉल सेंटर मध्ये काम करत असणाऱ्या मुलाने आपल्याकडे असलेली कंपनीची माहिती दुसऱ्या कंपनीला विकल्या बद्दल त्याला पकडण्यात आलं. यामुळे संगणक आणि त्यात असणाऱ्या माहितीची काळजी घेणाऱ्यांना माहिती चोरणारे आतले शत्रू आणि बाहेरचे शत्रू यांच्यापासून संरक्षण कराव लागत.यात बाहेरचे शत्रू म्हणजे ह्येकरस नावाने ओळखले जातात आणि त्यांच्या पासून कंपनीचा डेटा आणि माहिती चोरली जाण्याची जास्त शक्यता असते त्यांच्यात हि भरपूर प्रकार बघायला मिळतात.

७. घरात वापरल्या जाणाऱ्या वायरलेस तंत्रज्ञानाचा उपयोग बाजूच्या घरात राहणाऱ्याला महाजाल वापरण्यासाठी होऊ शकतो यात हि काळजी घ्यावी लागते.

मला स्वतःला मनोगतीला सांगावंस वाटत की आपल्या संगणकात असणारे आपले आणि आपल्या नातलगांचे फोटो हे कोणी चोरू नये यासाठी भरपूर काळजी घ्या किंवा एका सीडीमध्ये कॉपीकरुन ठेवा सर्वात महत्त्वाचा हाच डेटा आणि आपल्याकडे असलेली संपत्ती असते.

तंत्रज्ञानाद्वारे चोरी करणारे खूप बुद्धिमान असतात तुमचा थोडासा निष्काळजीपणा त्यांच्या फायद्याचा होऊ शकतो याची काळजी घ्या.

या सगळ्यात कुठले हि तंत्रज्ञान वापरत असताना ते योग्य प्रकारे वापर आहोत आणि आपल्या आजूबाजूचे हि त्याचा योग्य प्रकारे वापर करत आहेत याची काळजी घ्यावी.

१.या सगळ्यात आपण कुठेतरी तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेणाऱ्यांना थांबवू शकतो का ?

२. मनोगतीमध्ये तंत्रज्ञानाचा निष्काळजी पणे वापर केल्याने बळी पडणाऱ्यांची उदाहरण आहेत का ? परदेशात हि संख्या जास्त आढळते त्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळाली तर फारच छान.