मे १८ २००७

तक्ता (टेबल) कसा द्यावा

तक्ता (टेबल) कसा द्यावा

इथे मी हा तक्ता देते आहे. त्यात एच टी एम एल फेरफार मध्ये जाऊन योग्य त्या जागी योग्य ती माहिती बदलून आपला तक्ता बनवा.
आडवे १ उभे१आडवे १ उभे२आडवे १ उभे३आडवे १ उभे४
आडवे २ उभे१आडवे २ उभे२आडवे २ उभे३आडवे २ उभे४
आडवे ३ उभे१आडवे ३ उभे२आडवे ३ उभे३आडवे ३ उभे४
आडवे ४ उभे१आडवे ४ उभे२आडवे ४ उभे३आडवे ४ उभे४
आडवे ५ उभे१आडवे ५ उभे२आडवे ५ उभे३आडवे ५ उभे४
आडवे ६ उभे१आडवे ६ उभे२आडवे ६ उभे३आडवे ६ उभे४
आडवे ७ उभे१आडवे ७ उभे२आडवे ७ उभे३आडवे ७ उभे४
आडवे २ उभे१आडवे २ उभे२आडवे २ उभे३आडवे २ उभे४
आडवे २ उभे१आडवे २ उभे२आडवे २ उभे३आडवे २ उभे४

समजा तुम्हाला तक्त्यातले उभे गट (कॉलम)वाढवायचे आहेतः
हटमल फेरफार मध्ये जाऊन "<td>तक्त्याचा एक कप्पा</td>" हा गट म्हणजे तक्त्यातील एक कप्पा हे लक्षात घ्या. कॉलम वाढवायचे तर प्रत्येक ओळीतला ("<tr>मध्ये काहीतरी</tr>" हा समूह म्हणजे एक ओळ) एक/अनेक <td>कप्पा</td> वाढवून एक/अनेक कॉलम वाढवल्याचा परीणाम साधा.
हे लक्षात असू द्या की प्रत्येक कप्प्यातल्या वाढवलेल्या कप्प्यांची संख्या समान हवी. अन्यथा तक्ता वेडावाकडा दिसेल.

तक्त्याची किनार: जाडी व रंग:
तक्त्याच्या हटमल फेरफारात जाऊन <table border="" bordercolor=""> हा टॅग शोधा. यात बॉर्डर=१ आहे. तिथे २ वा जास्त केल्यास किनार जाड होईल. ० केल्यास किनार दिसणारच नाही.
बॉर्डरकलर="ब्लॅक" आहे तिथे "ब्ल्यु"/"ग्रे"/"रेड"/"पिंक" इ. लिहून रंग बदला. अधिक रंगछटा हव्या वाटल्यास http://www.webmonkey.com/reference/color_codes/ इथे पाहून बॉर्डरकलर="हव्या त्या रंगाची किमत त्यातल्या # चिन्हासहित" टाका. तुम्हाला कर्णाच्या दिशेने तक्त्याचे दोन भाग करुन किनारीत वेगवेगळ्या छटा हव्या असतील तर हा टॅग टाका: <table border="3" bordercolordark="blue" bordercolorlight=blue> इथे बॉर्डरकलरडार्क=तुम्हाला हवा तो रंग आणि बॉर्डरकलरलाइट=तुम्हाला हवा तो रंग असे करुन तक्ता रंगीबेरंगी करु शकता. हा पहा:

रंग माझा वेगळा!

तक्ता: समास,स्थान,आतली जागा इ.
तक्ता मधे,उजवीकडे,डावीकडे असा हवा असेल तर हटमल मधे असलेल्या <table border="" bordercolor=""> या टॅगला असे करा: <table border="" bordercolor="" align="center"> अलाइन= लेफ्ट किंवा सेंटर किंवा राइट पाहिजे तसे टाका.
तक्त्याच्या कप्प्यात जरा जास्त गर्दी वाटत असेल तर <table border="" bordercolor="" align="center" cellpadding=3> असे बदलून इथे सेलपॅडिंग=३ ऐवजी तुम्हाला पाहिजे ते कमीजास्त करुन जागा कमीजास्त करता येईल.
तक्त्याच्या दोन कप्प्यांतील अंतर कमी जास्त करायला <table border="" bordercolor="" align="center" cellpadding=3 cellspacing=5> असा टॅग बदला. सेलस्पेसिंगची किमत कमीजास्त करुन पहा. 
सरावाने तक्त्यांशी हवे तसे खेळायला जमते. प्रयत्न करुन पहा. तसेच तक्त्याच्या प्रत्येक ओळीचा कप्प्याचा रंगही बदलता येतो, पण ते परत कधीतरी लिहेन. हटमल ऐवजी सी एस एस मध्ये अधिक चांगले तक्ते बनवता येतात.
अधिक माहिती साठी हे पहा:  http://www.w3schools.com/html/html_tables.asp

Post to Feedधन्यवाद......
तुमचे सर्व लेख कुठे वाचता येतील ?
अधिक
ओ असं काय म्हणता
खो खो
खो खो खो खो
व्यापक ओळ/व्यापक गट बनवणे.
चौकशी

Typing help hide