मोक्ष

तव स्पर्शाने फुलते प्रतिभा
ओठांवरती आज तराणे
नको जोगिया आता छेडू
नको नको सूर उदासवाणे

तुला हवीशी गोड वेदना
मोक्ष मला दे अभिलाषेतून
प्रेमाची ही पवित्र गंगा
आज वाहू दे नसा नसातून...

- अनिरुद्ध अभ्यंकर