आमरस

  • आंबे १० (चांगले पिकलेले)
  • वेलची पुड (प्रमाणानुसार)
  • दुध (१/२ लिटर)
  • मावा (२ वाटी)
  • साखर (३ वाटी)
१५ मिनिटे
४ जण

प्रथम आंबे चांगले धुवुन घ्या.

(रसाचे आंबे नसल्यास) ते चारही बाजुंनी हलक्या हाताने दाबुन घ्यावे. आंबे हाताला मऊ लागल्यावर मग त्याचा रस काढावा.

रस काढताना प्रथम हात स्वच्छ धुवुन घ्या. मग देठाचा भाग कापुन चांगले दाबुन त्याचा रस काढा

रस काढलेल्या आंब्याच्या कोय व साली दुधात भिजवुन रस पुर्ण काढुन घ्यावा.

या रसात साखर (साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार), वेलची पुड, दुध, मावा एकत्र करुन हा रस मिक्सर मधे वाटुन घ्यावा (पाण्याचा वापर करु नये.)

झाला आमरस तयार.... थोडावेळ फ़्रिजर मधे ठेवुन थंड खावयास घ्यावा.....

रस काढताना हात व नखं स्वच्छ धुवुन घ्या. कारण बऱ्याच जणांना रस काढण्याच्या प्रक्रिये मुळे आमरस आवडत नाही. म्हणुन याची काळजी आपणच घ्यायची.

लहान मुलांना हा रस खास करुन द्यावा कारण त्यांना आंबे खाताना हमखास रस गळवण्याची सवय असते. मग कपड्यांना डाग??

साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार

आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या.

आजी