अननसाचे रायते

  • १ अननस
  • १ कप साखर
  • पाव कप पाणी
  • १/२ किलो घट्ट दहि
  • पाव चमचा चाट मसाला
३० मिनिटे
१० माणसांसाठी

अर्धे अननस बारीक चिरून घ्यावे. अर्धे अननस मिक्सरमधून पल्प करून घ्यावे. पाण्यात साखर घालून १ उकळी आणून विरघळवून घ्यावी. त्यात पल्प व अननसाचे तुकडे घालून एकत्र ढवळून घ्यावे. विस्तव बंद करणे. थंड झाल्यावर फेटलेले दहि घालून फ़्रिजमध्ये थंड करण्यास ठेवणे. वाढताना वरून चाट मसाला घालून वाढणे.



चाट मसाला न घालता वरून चार केशराच्या काड्या घातल्यास स्विट डिश म्हणून वापरता येते. शिवाय आंब्याच्या दिवसात अननसाच्या ऐवजी आंब्याचा वापर करावा.


हि माझी स्वतःची पाककृति आहे.