'चीनी कम' आणि 'लोखंडवाला'

'चीनी कम' च्या रांगेत उभा असतानाच एका मित्राचा निरोप आला. 'पस्तावलो. विचारही करु नकोस.' पण इतरांचे ऐकून स्वतःचे भले करुन घेतले तर तो मी कसला? पाच तिकिटे काढली. हे पुरेसे नाही म्हणून की काय, (किंवा 'काट्याने काटा ' निघतो काय ते बघू म्हणून) त्याच आठवड्यात 'शूटाआऊट ऍट लोखंड्वाला' ही पाहिला. त्यानंतर झालेल्या चर्चेत एका मित्राचे वाक्य लक्षात राहिले. 'आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी हळूहळू नाहीशा होताहेत. चांगले चित्रपट ही अशीच एक गोष्ट आहे.'
आजवर 'अमुक हा चित्रपट चांगला आहे, जरुर बघा' असे मी 'मनोगतीं' ना सांगत आलो आहे. इथे उलटे म्हणतो. हे चित्रपट बघीतले नाहीत तर श्वास बंद पडेल, अशी परिस्थिती असेल तरच त्यांच्या वाटेला जा. वर्तमानपत्रांत छापून येते ते सगळेच खरे नसते!