एका खेळियाने...

दिलीप प्रभावळकरांचे 'एका खेळियाने...' हे आत्मकथन नुकतेच वाचण्यात आले. त्यांनी बाबा एक विचारु!' नावाची छोटी नाटीका लिहिली होती. चौकस , शंकेखोर,हुशार मुलं बापाला प्रश्न विचारुन हैराण करतात. त्यातले काही संवाद

(बाबा वाचत बसलेले. निखिल येतो.वय ८)

बाबा एक विचारु?

हुं

मी आलो कुठून?

तू आतल्या खोलीतून

तसं नाही हो. मी इथे कसा आलो? म्हंजे या घरात. तुमच्याकडे?

हा हा तसं होय (विचारांत पडतात)..जा आईला विचार

विचारल. ती म्हणते बाबांना विचार. सांगा ना कुठून आलो

तू ना? आई हॉस्पिटलातून घेऊन आली तुला. छोटी छोटी मुलं असतात तिथं.

म्हणजे मला हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलं?

हो.---

(थोडा वेळ विचार करुन) बाबा एक विचारु?

आता काय?

तो आपल्या समोरचा अनिकेत आहे ना त्याच्या ताईचे पोट मोठं कसं झालं?

अं? ते- (अस्वस्थ) झालं आपल असंच.

अनिकेत म्हणतो, पोटात बाळ आहे.

असं ? असेल.

मग मला कशाला डॉक्टर कडून आणलं?

नाही. तुला डॉक्टर कडून म्हणजे ,तुला ऑपरेशन करुन बाहेर काढलं.

कशाच्या बाहेर?

आईच्या पोटाच्या, म्हणजे पोटातून बाहेर.

पण मी पोटात?....

जा आता जा( राग आवरत) आणखी काही विचारु नकोस, खेळ जा

--------------------------------------------------------------

थोड्या वेळाने( शिल्पा वय ५)

बाबा

काय?

एक विचारु?

विचार

मला आजी का नाही?

होती बाळा वारली.

म्हणजे ?

माणूस म्हातारा झाला की कशाने तरी आजारी पडतो आणि मरतो.

म्हातारा झाला तरच?

नाही कधी कधी आधीपण.

म्हणजे तुम्ही पण मरणार?

हो. मी, आई, मावशी, मामा, काका सगळे

सगळे एकदम मरणार?

नाही थोडे थोडे म्हणजे

आळीपाळीने?

म्हणजे एका मागोमाग एक. तू जा बघू मला वाचूदे.

----------------------------------------------------------

                       नाटिकेच्या शेवटी

बाबा आम्ही एक विचारु?

नाही विचार्लं तर नाही का चालणार (हताशपणे) काय आता?

तुम्हाला आम्ही दोन मुले की नाही?

मग आम्हाला तुम्ही एकटेच बाबा कसे दोन बाबा का नाहीत?

----------------------------------------------------------

------------------------------------------------------------