माझ्या चारोळ्या - २

पहिला पाऊस पडला तेव्हा
माझ्या डोळ्यांतही पाऊस होता
कुणालाच कळला नाही तो
इतका बाहेरच्या पावसाशी एकरूप होता

गार गार जलधारांत
चिंब भिजायचं होतं
पहिला पाऊस कसा असतो
ते तुझ्या मिठीतून पहायचं होतं

एक कळी मिटलेली
कायम मिटलेलीच राहिली
पूर्ण उमलण्या आधीच
कुणी तरी खुडून नेली

संध्याकाळ झाली म्हणून
तुळशी पुढे दिवा लावला
बाहेरचा अंधार निमाला
मनातला मात्र तसाच रहिला

मनातला अंधार
आच लागून तप्त झालेला
कुणी फ़ुंकर घालून काजळी दूर करेल
या वेड्या आशेने आसुसलेला