"कोकणस्थ बाणा"

:संगणकाच्या महाजालावर सापडलेला एक विनोद"

रानडे अतिशय काळजीत पडले होते.त्यांचा मुलगा खुपच उधळपट्टी करायला लागला होता. दरवर्षी ते उन्हाळ्यात एक डझन आंबे आणून चैन करायचे.त्यांच्या मुलाने या वर्षी चक्क  चार डझनाची पेटी आणली होती.त्यांनी आयुष्यभर मुलांना काटकसरीचे महत्त्व पटवले होते पण त्यांचा मुलगा आता ते विसरत चालला होता.

मुलाला काटकसरीचे महत्त्व कसे सांगावे हे त्यांना समजत नव्हते. शेवटी त्यांना एक युक्ती सुचली.त्यांचे एक स्नेही भिडे काटकसरीचे क्लास(शिकवणी) घ्यायचे.त्यांनी आपल्या मुलाला भिड्यांची शिकवणी लावली.

ठरल्याप्रमाणे रानडयांचा मुलगा रात्री उशीरा भिड्यांच्या घरी गेला. ख्रर्च वाचवायचा म्हणून भिड्यांच्या घराला बेल नव्हती.रानडयांचा मुलाने दारावरची कडी वाजवली.भिडे घरात आहेत का नाहीत हे कळत नव्हते कारण घरात अंधार होता.

काही वेळाने भिड्यांनी सावकाश दार उघडले. त्यांच्या अंगावर फ़क्त एक पंचा होता आणि हातात एक मेणबत्त्ती होती.

त्यांनी मुलाला आत बोलवले आणि ते दोघे आत जाउन बसले. घरात सर्वत्र अंधार होता, खाली बसल्यावर भिड्यांनी मेणबत्त्ती विझवली. हॉल मधे पूर्ण काळोख झाला. काही वेळ शांततेत गेला.

'घरात अंधार का आहे आलं का तुझ्या लक्षात? ' भिड्यांनी विचारले.

"हो आलं लक्षात. आवश्यक्त्ता नसताना जर दिवे वापरले तर उगाचच वीज जळते आणि खर्च वाढतो."- रानडयांचा मुलगा

'आणि मेणबत्त्ती का विझवली हे कळल का तुला?"-भिडे

"हो हे पण कळले. आपल्याला नुसतेच बोलायचे आहे. काही बघाय्चे नाही. मग कशाला मेणबत्त्ती जाळायची -"रानडयांचा मुलगा

'बरोबर. फ़क्त तेवढा हेतू नाही.आवश्यक्ता नसताना उगाच वस्तू वापरल्या तर त्यांची लवकर झीज होते आनि खर्च वाढतो. म्हणून मेणबत्त्ती विझवल्यावर मी पंचा काढून त्याची नीट घडी घालुन ठेवली आहे