जून २२ २००७

उकडलेली अंडी

जिन्नस

  • पातेले
  • पाणी
  • अंडी
  • विस्तव

मार्गदर्शन

१. पातेल्यात किमान अंडी बुडतील इतके तरी पाणी घ्यावे. थोडे अधिक घेतल्यास उत्तम.

२. पातेले विस्तवावर ठेवावे.

३. पातेल्यात अंडी एकमेकांवर किंवा पातेल्यावर आदळून फुटणार नाहीत अशा बेताने अलगद ठेवावीत.

४. विस्तव चालू करावा.

५. पाण्याला उकळी आल्यानंतर, अंडी कडक (hard-boiled) किंवा मऊ (soft-boiled) कशी उकडायची आहेत त्यावर अवलंबून, योग्य तेवढा वेळ विस्तव चालू ठेवून अंडी उकडू द्यावीत, आणि मग विस्तव बंद करावा. (वेळेचा अंदाज: मऊ उकडलेल्या अंड्यांसाठी पाण्याला उकळी आल्यावर सुमारे २ ते ३ मिनिटे; कडक उकडलेल्या अंड्यांसाठी पाण्याला उकळी आल्यावर किमान ५ मिनिटे. थोड्या अनुभवानंतर हा अंदाज अधिक शोधित (refine) करता यावा.)

६. उकळते पाणी अंडी बाहेर पडणार नाहीत अशा बेताने पातेले वाकडे करून फेकून द्यावे. नंतर पातेल्यात थंड पाणी ओतून अंडी हाताला चटका बसणार नाहीत इतपत निवू द्यावीत, आणि मग ती एकएक करून बाहेर काढून हाताने सोलावीत.

७. सोललेली टरफले फेकून देऊन अंडी मीठ आणि मिरपुडीबरोबर खायला द्यावीत.

टीपा

ही उकडलेली अंडी अंड्याच्या आमटीसाठी (पाठभेद: 'अंडाकरी' अथवा 'बैदाकरी') कच्चा घटक म्हणून (उकडलेली असली तरी, अर्थात शब्दशः कच्ची नसली तरी) अतिशय उपयोगी पडतात!

***आओ सिखा दूँ, तुम्हें अंडे का फंडा!***

माहितीचा स्रोत

अंडी उकडण्याची सर्वज्ञात पद्धत, अधिक कोणे एके काळचा स्वानुभव.

Post to Feedअपेक्षाभंग!
क्षमस्व!
कसोटी...
छान..
मनोरंजक
वरील अंड्यांचे सुरीशिवाय भाग कसे करावेत
कराड
मनोरंजन
एक शंका..
हाहा :)
शंकानिरसन
काय करावे?
उकडण्याआधीच
सुचना!
मीठ आणि लिंबू...
विस्तव
अन्डी चिरणे आवश्यक आहे?

Typing help hide