वाजला किती पाऊस...

वाजला किती पाऊस |
बदलता कूस |
जरा डोळ्यांनी ||

मधुनीच विजेचा लोळ |
स्मरणकल्लोळ |
रोमरोमांत ||
अंगणी उभा प्राजक्त |
गंधआरक्त |
देठ श्वासांचे ||
पाण्यात पडावे फूल |
तशी चाहूल |
पापण्यांना ये||
थेंबांत तेवतो दिवा |
तशा जाणिवा|
जाणिंवापैल||
बाहेरी संततधार |
गात मल्हार |
आत बैराग ||

१. गाजला  आधीच्या आवृत्तीत.
२. सडा आधीच्या आवृत्ती.