जुलै
८
२००७
कळप हुंदडे पुष्ट ढगांचा
मत्त हत्तीसम पिऊन वारा
वेदघोष पर्जन्यऋचांचा
करत चालल्या या जलधारानभमंची कल्लोळ माजवी
वीज नाचते सोडून लाज
धुंद होऊनी वरूण वाजवी
अनाहताचा जणु पखवाजकुंद हवेची काळी चादर
पांघरते जेव्हा धरती
थेंब टपोरे पिऊन डोंगर
स्वप्न मनी हिरवे बघतीआनंदाची अवखळ गाणी
कोठे गाती शुभ्र प्रपात
कोठे प्राशीत लाल वारुणी
नदी भटकते झिंगून जात***
उभी साठवत मनी चिंबपण
वेडी भिजते नाजुक वेली
हवीहवीशी जणू आठवण
कळी उमलते हळूच ओली...हवीहवीशी जणू आठवण
कळी उमलते हळूच ओली...
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
सुंदर..!
प्रे. परसूअण्णा (रवि., ०८/०७/२००७ - १९:०५).
चित्रमय
प्रे. अनील बोकील (सोम., ०९/०७/२००७ - ००:४८).
छान
प्रे. मिलिंद फणसे (सोम., ०९/०७/२००७ - ००:४९).
सहमत
प्रे. जीवन जिज्ञासा (सोम., ०९/०७/२००७ - ०१:५१).
अप्रतिम
प्रे. लेखकु (सोम., ०९/०७/२००७ - ०४:२२).
सुवाच्य आणि सुश्राव्य
प्रे. बकुळ (सोम., ०९/०७/२००७ - १२:०५).
वा..
प्रे. केशवसुमार (सोम., ०९/०७/२००७ - २०:११).
मस्त
प्रे. चित्त (सोम., ०९/०७/२००७ - २१:१५).
वाह !
प्रे. अनमिक (सोम., ०९/०७/२००७ - २१:४७).
सुंदर...
प्रे. स्मिता१ (मंगळ., १०/०७/२००७ - ०७:५४).
आभार..
प्रे. विसुनाना (बुध., ११/०७/२००७ - ०४:०६).
वा वा वा वा!!!
प्रे. नीलहंस (गुरु., १२/०७/२००७ - १२:३९).
वा!
प्रे. कुमार जावडेकर (शुक्र., २०/०७/२००७ - १८:१९).
कळप वा!
प्रे. प्रतिष्ठित (शुक्र., २०/०७/२००७ - २२:५४).
