रोटी, कपडा... (गजल)

रोटी, कपडा, मकान दे
सर्वांना तू समान दे...

इतरांना तू दे भरपूर
माझ्यापुरते किमान दे...

नाव लोटतो पुन्हा अता
सागरा, नवे तुफान दे...

लक्ष्य गाठण्यासाठी मज
एक उंचशी चटान दे...

पाखरास या उडायला
जरा खुले आसमान दे...

पाठपुरावा करायला
स्वप्न उराशी निदान दे!...

नकोच पोकळ आश्वासन
पक्की आता जबान दे...

(नको हक़ीकत सांगू तू
नजरेने मज बयान दे...)

आनंदाने जगण्या मन
निकोप ताजे-तवान दे...