हसा पण लठ्ठ होऊ नका.

गजाननराव एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून निघून मुंबई विमानतळावर उतरले. बाहेर सौ. ठमाकाकू वाट पहात असतील याची त्याना खात्री होतीच.त्याना कधी भेटेन असें त्याना झाले होते. कस्टम, इमिग्रेशन संपवून,सामानघेऊन बाहेर निघाले.

बाहेर येताच त्यानी सौ.ना एका बाजूला घेतले.आणि एक विशिष्ट पोज घेऊन विचारले. " ठमे, मी फ़ॉरीनर दिसतो का? "नाही " सौ. उत्तरल्या.

गजाननरावनी पोज बदली करून विचारले. " आतां तरी फ़ॉरीनर दिसतो का? "

" नाही हो, पण का ?  इति काकू

त्याचे काय झाले, लंडन विमानतळवर उभा होतो तेव्हा एक बाई म्हणाली, " यू लुक फ़ॉरीनर "

गुरुजी