मन्मना रे!

जुलुम जे त्यांनी करावे तू सहावे, मन्मना रे
आसवे प्यावी, तरीही तू हसावे मन्मना रे ॥

रीत प्रेमाची जुनी आहे अशी जगिया पुराणी
दुःख ते देतात, तू आशीश द्यावे, मन्मना रे ॥

उतरली जी, नजर पूर्वी, काळजाच्या अंतरंगी
ती तुला आधार होता, तू तरावे मन्मना रे ॥

त्रास ते देतील सारे, जगही छळेल, तुला जरी
परी उराशी, कामनेला, तू धरावे, मन्मना रे ॥

--अदिती
(२८ जून २००७)
निज ज्येष्ठ, शके १९२९
(उठाये जा उनके सितम या हिंदी गाण्याचा अनुवाद)