जुलै १७ २००७

'उत्तर'

मिटून डोळे
एक चेहरा
समोर धर...
प्रेम तुझे
त्याच्यावर आहे
कबूल कर...

ठाउक आहे
जीव लावणे
सोपे नाही...
कबूल केल्यावर
निभावणे
सोपे नाही...

दुसऱ्याआधी
स्वतःलाच तू
दे उत्तर...
प्रेम खरे जर
असेल तर तू
कबूल कर...

  यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?
सुंदर
असेच वाटले
अप्रतिम !!!
बरी
माझ 'उत्तर'!!!!
वा!
सहमत
हेच..
सहमत
वाव्वा
छान!
वा!

Typing help hide