'ना-ना' खुले म्हणालो, 'हो-हो' मनात केले
सारे तुझे बहाणे मी आत्मसात केले!
फसलो जगामुळे पण हसलो जगापुढे मी
का प्रेम ह्या जगावर मी तहहयात केले?
भीती जरा न उरली आता मला कुणाची
हेतू मनातले मी सर्वांस ज्ञात केले...
होतो पुढे निघालो घेऊन साथ ज्यांना
त्यांनीच नेमके का विश्वासघात केले?
देऊ कसा जगाला उपदेश एकतेचा
व्यवहार मी स्वतःचे पाहून जात केले
- कुमार जावडेकर
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
सुंदर
प्रे. चित्त (गुरु., १९/०७/२००७ - २२:२५).
मतला
प्रे. मिलिंद फणसे (शुक्र., २०/०७/२००७ - ०१:१०).
वाहवा
प्रे. विसुनाना (शुक्र., २०/०७/२००७ - ०४:२९).
सुंदर
प्रे. माफीचा साक्षीदार (शुक्र., २०/०७/२००७ - ०४:२९).
वाव्वा!
प्रे. चक्रपाणि (शुक्र., २०/०७/२००७ - ०५:०५).
सहमत..
प्रे. केशवसुमार (शुक्र., २०/०७/२००७ - १६:५५).
जात
प्रे. पुलस्ति (शुक्र., २०/०७/२००७ - १३:०४).
'जात' जात नाही
प्रे. कुमार जावडेकर (शुक्र., २०/०७/२००७ - १६:४५).
जात का ज्यात
प्रे. सागर लिमये (शुक्र., २०/०७/२००७ - १६:५६).
जात
प्रे. कुमार जावडेकर (शनि., २१/०७/२००७ - ०७:५३).
वा!
प्रे. अजब (शुक्र., २०/०७/२००७ - १७:१७).
वा!
प्रे. श्रावण मोडक (रवि., २२/०७/२००७ - १२:०६).
