जुलै
२१
२००७
नागमोडी वळणाने शिरते हिरव्या रानी वाट
गवताच्या पात्यावर उतरे संदर हिरवी पहाट..
दूरदूरच्या निळ्या सावळ्या
डोंगरांची स्तब्ध समाधी
उषेची लागते चाहूल
भास्कराच्या येण्याआधी
रूमझूमणारी, सळसळणारी अवख़ळ पाऊलवाट
गवताच्या...
थरथरणारी तनू सावरे
हलकेच जागल्या गाई
इवले दवबिंदू निजले
उद्या उठण्याची घाई
सौभाग्याने भरून गेले क्षितिजेचे ललाट
गवताच्या...
मंदीराच्या गोपुरांवर
सोन्याचे झळके झुंबर
संथ जलाशयी पाहते
वाकूनीया निळे अंबर
फांदीवरूनी ताना घेती रविराजाचे भाट
गवताच्या ....
- मंजुश्री.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वा !
प्रे. अरुण वडुलेकर (रवि., २२/०७/२००७ - १२:३९).
स्वप्नमय वर्णन
प्रे. मीना कोळी (रवि., २२/०७/२००७ - १५:४२).
कविता चित्रमय आणि सुंदर
प्रे. विसुनाना (रवि., २२/०७/२००७ - १८:२७).
फार सुरेख!
प्रे. अदिती (सोम., २३/०७/२००७ - १३:२६).
सहमत
प्रे. श्रावण मोडक (मंगळ., २४/०७/२००७ - १०:२८).
अप्रतिम
प्रे. मिलिंद फणसे (मंगळ., २४/०७/२००७ - ०१:४७).
आई ग्गऽऽऽऽऽ
प्रे. स्तुतिपाठक (मंगळ., २४/०७/२००७ - ०४:४८).
छान
प्रे. चित्त (मंगळ., २४/०७/२००७ - ०५:१२).