पोलाद - पु‌. शि.रेगे

पु. शि. रेग्यांची मला आवडलेली ही एक लहानशी आणि सुंदर कविता. शुद्धलेखन मूळ कवितेत आहे तसेच ठेवले आहे -

रगेल तिच्या पोलादाच्या

ओठांवर कधि

इंदीवर जेव्हा फुलते

स्पष्ट त्याच्या पाकळिवर एका

सुइच्या अग्राइतका

रक्तबिंदु जो दिसतो -

तो माझा.

उत्सव तो माझा

जा जाउन सांगा तिला

पोलादाच्या कडेकोट बंदोबस्तातुन.